पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त आज ऐतिहासिक बारव पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ

Foto
गणेशवाडी येथे भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील गणेशवाडी येथील श्री क्षेत्र रामगड संस्थान येथे आज लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवांच्या पुनरुजीवन (जीर्णोद्धार) कामाचा भव्य शुभारंभ होणार आहे.
या अंतर्गत गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील एकूण पाच ठिकाणच्या ऐतिहासिक बारवांचे तात्काळ पुनरुज्जीवन कार्य सुरू करण्यात येणार आहे. जलसंवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जतन या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदूर येथील होळकर घराण्याचे श्रीमंत मुकुंदसिंह नानासाहेब राजे होळकर भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीक्षेत्र देवगड येथील
प.पू. भास्करगिरीजी महाराज तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज, श्रीक्षेत्र अरण येथील ह.भ.प. रमेश महाराज वसेकर यांच्या हस्ते होणार आहे. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या विशेष प्रयत्नातून दोन्ही तालुक्यातील ऐतिहासिक बाखांचे प्रत्यक्ष काम हाती घेण्यात आले असून, ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

बारव पुनरुज्जीवनासाठी मंजूर निधी :
बाबरगाव २९,०२, ९३८
दहेगाव ३८, ३६, ७७५
कायगाव ५९, ५३,०५८
वेरुळ २७, ९५, ९९०
गणेशवाडी २७, २३, २०२

या बारवांच्या जीर्णोद्धारामुळे ऐतिहासिक ठेवा जपला जाणार असून, पावसाचे पाणी साठवणूक वाढून शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या बाख
म्हणजे केवळ पाण्याचे स्रोत नसून आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. या बारवांचे पुनरुजीवन करून जलसंवर्धन व इतिहास जतनाचा दुहेरी उद्देश साध्य होणार आहे.
प्रशांत बंब. आमदार गंगापूर